राधानगरी

बायसन नेचर क्लब

आमच्याबद्दल

महाराष्ट्र या निसर्गाने समृध्द असलेल्या राज्यातील कोल्हापुर या जिल्ह्यामधे राधानगरी हे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी अनेक प्रदुषण मुक्त, निसर्गचा ठेवा असलेली स्थळे असुन सुध्दा योग्य प्रसिध्दी अभावी ती विकसीत झालेली नाही आहेत.म्हणुनच ह्या पर्यटन स्थळांची माहीती करुण देण्यासाठी ह्या वेबसाईट ची निर्मिती केली आहे.

राधानगरी तालुक्यामध्ये छ. राजर्षि शाहु महाराजांच्या प्रेरणेतुन अनेक पर्यटन स्थळे उद्ययास आली आहेत.यामध्ये प्रामुख्याने गवा या प्राण्यासाठी प्रसिध्द असलेले ’गवा अभयारण्य’, तसेच १०० वर्ष पुर्ण झालेले ’राधानगरी धरण’, भारतातील सर्वात जुना ’जलविद्युत प्रकल्प’, महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य प्रकल्प असलेले ’शाहुसागर धरण’ दुधगंगानगर, सह्याद्रीच्या कुशीत असलेले ’राउतवाडी, रामणवाडी, धबधबे’, ’तुळशी धरण’, चक्रेश्वरवाडी या ठिकाणी असलेले पुरातन ’शिव मंदिर’, तसेच अनेक निसर्गरम्य,प्रदुषण मुक्त, प्रसिध्दी पासुन अलिप्त असलेली पर्यटन स्थळे आहेत.

हि स्थळे तुम्ही मित्र-मैत्रिणी,सहकुटुंबासह पाहु शकता.ही पर्यटन स्थळे फक्त पर्यटनच नाही तर विविध प्रकारचे निसर्ग शिक्षण पण देतात. खासकरुन विद्यार्थी व शिक्षकांनी ह्या पर्यटन स्थळाना आवर्जुन भेट द्यावी.

*अधिक माहिती साठी संपुर्ण वेब साईट पहावी.

जवळची पर्यटन स्थळे

...
गोवा

अंतर : 160km

...
कोल्हापूर

अंतर : 80km

...
कुणकेश्वर

अंतर : 81km

...
मालवण

अंतर : 78km

...
वेगुंर्ला

अंतर : 88km

...
आदमापुर

अंतर : 42km

...
पुणे

अंतर : 390km

...
मुंबई

अंतर : 484km